Wednesday, March 11, 2009

पहिले विश्व मराठी साहित्य संमेलन - माझे मनोगत

नुकत्याच पार पडलेल्या पहिल्या विश्व मराठी साहित्यसंमेलनात स्वयंसेवक म्हणून काम करण्याची संधी माझ्या सुदैवाने मला प्राप्त झाली.  संमेलनापुर्वि आणी आता संमेलनानंतरही बरयाच जणांनी मला विचारले की नक्की कशासाठी केला होतात तुम्ही हा अट्टाहास?  तर ह्या मुद्दाबद्द्लची माझी वैयक्त्यीक मते मी ह्या लेखात  मांडत आहे.

खर तरं "साहित्य" हा शब्द ऎकला की माझ्या बरयाच मित्रमंड्ळींच्या छातीत धडकी भरते.  रात्री झोप येत नसेल तर ती पटकन यावी याकरता साहित्य उपयोगी पड्ते असा ऎक सर्वसाधारण समज आहे (आणी काही काही साहित्या बाबत तो समज अगदीच काही गैर नाही!). पण मला असे वाटते की, उक्रुष्ट साहित्यावीना कुठलीही कलाक्रुति यशस्वी होऊच शकत नाही, मग कलाकार कितीही मोठा का असेना! चांगल्या कथेविना सिनेमा किंवा नाटक लोकांना आवडेल का? पण असे असुन देखील साहित्यीकांना मात्र फ़ारसे कोणी नावाजत नाही ही मला नेहमी वाटत आलेली खंत आहे.  आता अलीकड्चेच उदाहरण घ्या ना! "स्लमडाँग मिलीयाँनर" ह्या चित्रपटला ८ आँस्कर ची बक्षीसे मिळाली, पण ज्या पुस्तकावर हा चित्रपट आधारीत आहे त्या पुस्तकाचे लेखक "विकास स्वरुप" ह्यांचा मात्र कोणीच गौरव करत नाही ह्याचे खुप आश्चर्य वाट्ते.  गेल्या वर्षी हाँलीवुड मधील सर्व लेखक मंड्ळी संपावर गेली तेव्हा टीव्ही वाल्यांची जी काही त्रेधातिरपीट उडाली होती ती आपण सर्व जाणतोच.  गेल्या वर्षीचा आँस्करचा कार्यक्रम सपशेल पडला असे म्ह्टले तर अतिशयोक्ती होणार नाही.  एकंदरीत साहित्यीक हा नेहमीच उपेक्षीला जातो असा माझा अनुभव आहे.  त्यामुळे जेव्हा आमच्या मंड्ळाने साहित्यसंमेलन करण्याचे ठरवले तेव्हा त्यांना मदत करणे हे आपले कर्त्यव आहे असे मला वाट्ले.  आता चांगले लेखन किंवा काव्य  करुन "साहित्यसेवा" करण्याची नाही लायकी आमची, पण निदान "साहित्यीक सेवा" तरी करावी असे वाटले एतकेच!

काहीं जणांनी असे ही म्हटले की ह्या साहित्यसंमेलनात साहित्यापेक्षा मनोरंजनावर जास्त भर देण्यात आला आहे.  हे वाचुन तर मनात थोडे हसुच आले. मनोरंजनाचा आणी साहित्याचा काहीच संबंध नाही का हो?  मनोरंजक कार्यक्रम हे शेवटी साहित्यावरच आधारलेले असतात ना?  मग मनोरंजन झाले तर ते साहित्य नव्हे, कारण साहित्यावर आधारलेले कार्यक्रम हे नेहमी रटाळच व्हायला हवेत, ह्या विचारसरणीमुळेच कदाचीत सामान्य मराठी माणुस साहित्य संमेलनांपासुन घाबरुन दुर पळत असावा.  त्या मराठी माणसाला जर साहित्यसंमेलनाकडे आकर्षित करायचे असेल तर ही संकुचीत विचारसरणी आपल्याला बदलायला हवी. पुलंचे साहित्य हे जितके मनोरंजक आहे तितकेच साहित्यीक द्रुष्टीकोनातुन मौल्यवान आहे.  सलीलने गायलेल्या संदीपच्या गाण्यांबाबतही हेच म्हणता येईल.  खरे तर, संमेलनात साहित्य सादर करताना ते मनोरंजनात्मक पध्द्तीने सादर करणे हे आव्हान साहित्यीकांनी स्विकारायला हवे, आणि ते आव्हान त्यांनी जर का स्विकारले नाही तर जगभर पसरलेला मराठी समाज हा साहित्यसंमेलनांपासुन दुरच राहील.  ह्या ठिकाणी एक खास उदाहरण द्यावेसे वाटते.  विश्व संमेलनाच्या शेवटच्या दिवशी "संत वांड्म्य आणी आधुनिक विद्यान" नावाचा एक परिसंवाद होता. विषयाचे नावच इतके भारदस्त की माझ्यासारख्या सामान्यांना नाव ऎकताच डुलकी यावी!  पण ह्या परिसंवादात श्री. मिलींद जोशी ह्यांनी, त्यांना देण्यात आलेल्या थोड्या वेळात, विनोदाच्या आधारे आपले विचार अगदी सुरेखपणे मांडुन रसिकांची मने जिंकली.  अशाप्रकारे जर मनोरंजक पध्द्तीने साहित्य लोकांसमोर मांडले तर मग प्रेक्षकांना साहित्य कंटाळवाणे वाटणार नाही, आणी मग लवकरच प्रेक्षकांचे रुपांतर श्रोत्यांत होईल.  

एकंदरीत पहाता पहिले विश्व मराठी संमेलन यशस्वी झाले असे म्हणायला हरकत नाही.  संमेलनाची तयारी करताना "कधी गहीवरलो, कधी धुसपुसलो", पण जी काय मेहेनत घेतली तीचे चीज झाल्याचे समाधान वाटले.  भारतातुन आलेल्या काही ओळखीच्या तर अनेक अनोळ्खी साहित्यप्रेमींची सेवा करण्याची मला संधी मिळाल्याने आनंद द्विगुणीत झाला.  ह्यापुढेही विश्व मराठी साहित्य संमेलन दर दोन वर्षांनी करण्याची ही नविन प्रथा चालू ठेवण्यास जगाच्या पाठीवर कोणीतरी, कुठेतरी पुढाकार घेईल अशी आशा वाटते, आणी जर का कोणी नाहीच पुढाकार घेतला तर आमचे बे एरिया महाराष्ट्र मंड्ळ परत कंबर कसेल अशी खात्री वाट्ते.

अजय चित्रे
फ़्रीमाँट, कँलीफ़ोरनीया

6 comments:

  1. टीकाकार: अहो चित्रे... तुमचा लेख नाही आवड्ला पण तुमचे अक्षर मात्र आवडले. कस बुवा जमलं तुम्हाला?

    मी: ती किमया आहे ह्या फ़ोन्ट्सची.... http://www.baraha.com/BarahaIME.htm ह्या फ़ोन्टने WordPad मधे टाईप केले आणि चक्क ब्लोग मधे Paste केले! It is बघा that simple... आईशप्पथ! तुम्हाला देखिल जमेल... बहुतेक ;)

    ReplyDelete
  2. Ajay,

    Naveen upakramakarta shubheccha! :)

    ReplyDelete
  3. Abhinandanm Ajay !! Way to go..
    -Preeti.

    ReplyDelete
  4. एकदम सहमत. साहित्य सम्मेलन मनोरंजक का करू नये हा प्रश्न आवडला. सम्मेलनावर खरच बरच लिहायचं मन आहे. प्रत्यक्ष बघितल्यानंतरपासून फारच. म्हणून ईथे लिहायचे टाळतोय.

    तुमचं मत वाचायला आवडले. आणि नवा उपक्रम स्तुत्य.

    ReplyDelete
  5. Great, Ajay. Hey wachlyawar Sahitya Sameelan Nakich attend Karayala aavdel.Me tar indian rahun suddha attend kele naahi.
    Tanuja

    ReplyDelete
  6. HI,
    Ajay,Tu far chan lehitos,very good lihit raha,wachayla aawdel.shubhecha.
    sanju.

    ReplyDelete